मांस

मद्रास चिकन

Comments are Disabled

साहित्य
बोनलेस चिकन : अर्धा किलो
लसूण पाकळ्या : ७ ते ८
हिरवी मिरची : १ ते २
मद्रास कांदे : १० ते १५
क्रीम : ३ ते ४ चमचे
मलकापूरी पावडर : आवश्यकतेप्रमाणे
हळद
जिरं
वेलची
काळीमिरी
दालचिनी
बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल
मीठ

कृती

प्रथम लसूण आणि हिरवी मिरची कुटून घ्या.
आता पॅनमध्ये तेल गरम करून वेलची,काळीमिरी आणि दालचिनी घालून फोडणी तयार करा.
आता त्यात मद्रासी कांदे फ्राय करून घ्या.
कांदे फ्राय झाल्यावर त्यात बोनलेस चिकन आणि लसूण मिरचीचा ठेचा घालून फ्राय करून घ्या.
आता त्यात हळद,जिरं,मीठ आणि मलकापूरी पावडर घालून परतून घ्या. आता गॅस मंद करून ४ ते ५ मिनिटं शिजवून घ्या.
थोडं शिजल्यावर पुन्हा गॅस मोठा करा.
थोड्यावेळाने गॅस मंद करून त्यात क्रीम घाला आणि गॅस मोठा करा.
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
अशाप्रकारे मद्रास चिकन तयार

Comments are closed.