साहित्य
पनीरचे चौकोनी तुकडे : आवश्यकतेप्रमाणे
काजूची पेस्ट : २ चमचे
क्रीम : १ चमचा
आलं-लसूण पेस्ट : १ चमचा
मस्टर्ड ऑइल : १ छोटा चमचा
दही : १ छोटा चमचा
पुदिना : १ छोटी वाटी
कोथिंबीर : १ वाटी
मोझरेला चीझ : अर्धी वाटी
हळद : पाव चमचा
हिरवी,पिवळी आणि लाल
सिमला मिरचीचे तुकडे
हिरवी मिरची
मिरपुड
चिली फ्लेक्स
बटर
काळं मीठ
साधं मीठ
कृती
मिक्सरमध्ये क्रीम,काजूची पेस्ट,काळं मीठ,साधं मीठ,हळद,हिरवी मिरची,मिरपुड,चिली फ्लेक्स,आलं-लसूण पेस्ट आणि मस्टर्ड ऑइल लावून घ्या.
तयार मिश्रण बाऊलमध्ये काढून त्यात दही घालून फेटून घ्या. आता मिक्सरमध्ये पुदिना,कोथिंबीर,काळं मीठ,साधं मीठ,मिरपूड,हिरवी मिरची मोझरेला चीझ वाटून चटणी तयार करून घ्या.
पनीरचे तुकड्यांना तयार चटणी लावून मॅरिनेट करून घ्या.
आता स्टिकला हिरवी,पिवळी आणि लाल मिरचीचे तुकडे लावून त्यावर पनीरचा तुकडा लावून त्यावर चटणी पसरवून त्यावर पनीरचा दुसरा तुकडा ठेवून रत्यावर चटणी पसरवून त्यावर पनीरचा तिसरा तुकडा ठेवून त्यावर चटणी पसरवून त्यावर पुन्हा हिरवी,पिवळी आणि लाल मिरचीचे तुकडे लावून फ्रिजमध्ये थोडावेळ सेट करायला ठेवा.
पॅनमध्ये बटर गरम करून त्यावर पनीर फ्राय करून घ्या.
फ्राय केल्यावर गॅसवर झाळी ठेवून त्यावर थोडं ग्रील करून घ्या.
अशाप्रकारे पनीर हिल टॉप तयार




