भिन्न, मुख्य

मॅगी भजी

Comments are Disabled

साहित्य : २ पॅक मॅगी, एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, प्रत्येकी अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर-कोबी(तुम्हाला आवडतात त्या भाज्या यात घालू शकता), १ कप बेसन, पाव कप कोर्नफ्लोर, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, चवी नुसार मीठ.

कृती : सर्वात आधी २ पॅक मॅगी रोजच्या पेक्षा कमी पाण्यात टेस्ट मेकर घालून शिजवून बाजूला ठेवा(ड्राय असली पाहिजे, पाणी नको राहायला). नंतर एका बाऊलमध्ये एक उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर-कोबी आणि मीठ घालून ५ मिनटं बाजूला ठेवा, म्हणजे त्याला पाणी सुटेल. त्यानंतर त्यामध्ये बेसन, कॉर्न फ्लोर, लाल तिखट, हिरवी मिरची, चाट मसाला, गरम मसाला घालून सगळं नीट एकत्र मिक्स करा. शेवटी शिजवून थंड केलेली मॅगी घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करा. सर्व मिश्रण एकजीव करून घ्या (यात पाणी घालायची अजिबात गरज नाही, शिजवलेली मॅगी आणि भाज्यांच्या ओलेपणामुळे सगळं मिश्रण एकजीव होतं). मीठ लागलं तरच अजून घाला कारण आधीच आपण भाज्यांमध्ये घातलंय, मग मस्त भजी गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम भजी सॉस किंवा पुदिना चटणीसोबत गरम सर्व्ह करा.

– शीतल राऊत, वसई.

Comments are closed.