
साहित्य :
१ कप बारीक चिरलेला कोबी, १/४ कप बारीक चिरलेली सिमला मिरची, १/४ कप किसलेला गाजर, १/४ कप उकडलेले मक्याचे दाणे, १ कप मेयोनिज, १/२ कप क्रीम चीज, १ टीस्पून काळी मिरीपावडर, १/२ टीस्पून ओरेगानो, मीठ चवीनुसार, १० ब्रेड स्लाइस.
कृती :
प्रथम एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कोबी घ्यावा. त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची, किसलेला गाजर आणि मक्याचे उकडलेले दाणे घालावेत. मग त्यात मेयोनिज, क्रीम चीज घालावे. त्यातच काळी मिरीपावडर, ओरेगानो आणि चवीपुरतं मीठ घालावं आणि मिश्रण चांगलं एकत्र ढवळावं. हे मिश्रण एकदम क्रीमी होत असल्याने ब्रेड स्लाइसला चटणी अथवा बटरची वेगळी गरज भासत नाही. नंतर ब्रेडच्या कडा कापून हे मिश्रण समान प्रमाणात लावून त्रिकोनी आकारामध्ये कापून सर्व्ह करावे.