
साहित्य- पाव किलो रवा, दोन कांदे, एक टोमॅटो, कोथिंबीर, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, खायचा सोडा, ताक, चवीपुरतं मीठ, हिंग, कढीपत्ता, मोहरी व तेल
कृती- प्रथम रवा ताकामध्ये एक तास भिजत ठेवा. एक तासानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, खायचा सोडा घालून सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या. दुसरीकडे मंद आचेवर फोडणीच्या भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग घालून फोडणी तयार करा व ती फोडणी रव्याच्या मिश्रणावर घाला. पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करा. आता आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यात थोडंसं तेल लावून मिश्रण चमच्याने आप्पे पात्रात सोडा. आप्प्यांना लालसर रंग येताच ते परतणं आणि नंतर दुसरी बाजू भाजल्यानंतर आप्पे पात्रातून सुरीच्या सहाय्याने काढून घ्या. सुंदर व खुसखुशीत तसंच पचनास हलकं असं हे आप्पे टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.