
साहित्य- अर्धा कप किसलेलं चीज, मीठ आणि मिरपूड चवीनुसार, चिमूटभर सोडा, ब्रेडक्रम्स आवश्यकतेनुसार, एक चमचा मिरचीचे बारीक तुकडे, दोन चमचे बारीक केलेले लसणाचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप मैदा, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, पंधरा ते वीस मशरूम, तेल.
कृती- प्रथम मशरूमचे छोटे तुकडे करुन घ्या. त्यात किसलेलं चीज, हिरवी मिरची, मीठ, मिरपूड (चवीप्रमाणे), बारीक केलेले लसणाचे तुकडे आणि कोथिंबीर हे सगळं एकत्र करून बाजूला ठेवा. मैदा, कॉर्नफ्लोअर, सोडा, तेल आणि मीठ हे जिन्नस एकत्र करुन त्याची घट्ट पेस्ट बनवून घ्या. त्यात वरील मिश्रण घाला. आता याचे गोळे बनवून ब्रेडक्रम्प्स मध्ये घोळवून मग गरम तेलात सोडा. तळताना गॅस मंद आचेवर असावा.
सिद्धीका खवळे, बोरिवली



