भिन्न, मुख्य

अमृतसरी पिंडी छोले

Comments are Disabled

साहित्य:
२ वाट्या रात्रभर भिजवलेले काबुली चणे , २ टी बॅग्स, ४ लवंग, ५-६ मिरी, २ काडी दालचिनी, प्रत्येकी २ मसाला वेलची नि हिरवी वेलची, २ तमालपत्र, चिमूटभर सोडा, प्रत्येकी दोन कांद्याचा नि टोमॅटोचा गर मिक्सरला बारीक करून, ४-५ लसूण, आल्याची पेस्ट, एक चमचा कसुरी मेथी, मोठा एक चमचा तेल फोडणीसाठी, हळद अर्धा चमचा, तिखट एक चमचा, छोले मसाला २-३ चमचे, चवीनुसार मीठ.

वरून फोडणीसाठी साहित्य – तेल 2चमचे, ४-५ लसूण, २-३ हिरव्या मिरच्या मध्ये कापून, एक चमचा जिरं भाजून पूड करुन, अर्धा चमचा तिखट

कृती:
प्रथम छोट्या कुकरमध्ये भिजवलेले छोले घ्या नि त्यात ४ वाटी पाणी घाला.
नंतर टी बॅग्स, लवंग, मिरी, दालचिनी, मसाला वेलची नि हिरवी वेलची, तेज पत्ता हे सर्व एका एक कापडी पोटलीत भरुन ती पोटली पाण्यात टाका.
चिमूटभर सोडा टाका नि ४ शिट्ट्या घ्या.
कुकर थंड झाला की पोटली काढून बाजूला ठेवायची. छोले नि पाणी बाजूला करा.
थोडे छोले रवीने ठेचा, म्हणजे छोल्यांची ग्रेव्ही घट्ट होते.
मग पॅनमध्ये तेल गरम करून त्यात टोमॅटो नि कांद्याची पेस्ट घालून ती परता.
मग त्यात आलं-लसूणाची पेस्टही टाका.
नंतर हळद, तिखट, कसुरी मेथी, मीठ नि छोले घालून सर्व मिश्रण चांगलं परतायचं.
मग छोले शिजवलेलं पाणी (ह्या पाण्याला सगळ्या मसाल्यांचा स्वाद असतो ) लागेल तसं घालून एकजीव करावं.
५ मिनिटं सारं उकळू द्यावं. मग दुसऱ्या छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून लसूण, मिरची नि जिऱ्याची पावडर व तिखट टाकून खमंग फोडणी करून वरून घालावी आणि एकजीव करा.
मस्त खमंग अमृतसरी पिंडी छोले तयार… भटुरे किंवा पुरी बरोबर सर्व्ह करावेत.

Comments are closed.