भिन्न, मुख्य

रवा बेसन केक

Comments are Disabled

साहित्य:
१ वाटी रवा,१ वाटी बेसन,१ वाटी तेल,१ वाटी मिल्क पावडर,२ वाट्या दूध,१ वाटी पिठी साखर,१ चमचा बेकिंग पावडर,अर्धा चमचा बेकिंग सोडा,३ चमचे टुटीफ्रूटी, १ चमचा,१ चमचा इसेन्स,काजू.

कृती:
प्रथम तेल,मिल्क पावडर,पिठी साखर आणि दूध एकत्र करून थोडा वेळ फेटून घ्या.
आता त्यात रवा आणि बेसन,तसंच पुन्हा अर्धी वाटी दूध घालून सगळं मिश्रण पुन्हा १५ मिनिटं फेटून घ्या आणि मिश्रण १५ मिनिटं ठेवून द्या.
नंतर त्यात अजून अर्धी वाटी दूध घालून केकचं मिश्रण तयार करावं.
शेवटी त्यात बेकिंग सोडा,बेकिंग पावडर, टुटीफ्रूटी आणि इसेन्स घाला.
एका भांड्याला थोडं तूप व बेसन लावून त्यात हे मिश्रण ओता.
कुकरमध्ये जाळीचा स्टॅन्ड ठेवून त्यावर हे भांडं ठेवून मंद आचेवर केक किमान अर्धा तास शिजवत ठेवा. (कुकरमध्ये पाणी ठेवू नये तसेच शिटीही लावू नये)

Comments are closed.