
साहित्य-:२ वाट्या सुकी लाल मिर्ची, १/४ कप तेल,१/४ कप बारीक कापलेला लसूण ,२ टेबलस्पून ,बारीक चिरलेले अद्रक, १/४ कप पाणी , १/२ टिस्पून मिरे पावडर , ४ टेबलस्पून व्हिनेगर, २ टेबलस्पून सोया साॅस, १ टेबलस्पून साखर, ४ टेबलस्पून टोमॅटो साॅस, चवीपुरते मीठ.
कृती-:प्रथम सुकी लाल मिर्ची गरम पाण्यात ३० मिनिटे भिजवावी. जास्तीचे पाणी बाजूला काढुन मिरचीचे मिक्सर मधुन मऊसर वाटण तयार करून घ्यावे. एका कढई मध्ये तेल गरम करून त्यात अद्रक व लसूण टाकून २ मिनिटे परतवून घ्यावे. त्यानंतर तयार मिरचीचे वाटण घालावे. २ मिनिटे परतवून घेतल्यावर १/४ कप पाणी मिक्स करावे. झाकण ठेऊन १५ मिनिटे कमी आचेवर शिजवावे. तेल वेगळे होण्यास सुरवात झाल्यावर त्यात मिरे पावडर, व्हिनेगर, सोया साॅस, टोमॅटो साॅस, साखर व चवीपुरते मिठ घालावे. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होई पर्यंत २ मिनिटे शिजवावे. तयार शेजवान साॅस चिप्स अथवा फ्राईज सोबत सर्व्ह करावा.
सौ. दिप्ती विक्रांत राखुंडे न्यु जर्सी, युएसए.