मांस, मुख्य रेसिपी

चिकन करी

Comments are Disabled

साहित्य-:अर्धा किलो चिकन, २ चिरलेले कांदे, २ टोमॅटो, ८-१० लाल सुक्या मिरच्या, ८-१० काजू, १ चमचा धने पावडर,१ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला,अर्धा चमचा चिकन मसाला, १चमचा कसुरी मेथी, तेल, मीठ चवीनुसार आणि २ चमचे आले – लसूण पेस्ट(८ लसूण पाकळ्या,अर्धा इंच आले,२,३ हिरव्या मिरच्या) मेरिनेशन-: चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट,पाव चमचा हळद,अर्धा चमचा चिकन मसाला, अंदाजानुसार मीठ व २ चमचे लिंबाचा रस घालून अर्धा तास ठेवावे.


कृती-:प्रथम लाल सुक्या मिरच्या व काजू थोड्या तेलावर परतून घ्या आणि गार झाले की मिक्सरमध्ये वाटून घ्या.त्यातच २ टोमॅटो घालून त्याची प्युरी करून घ्या.कढईत तेल गरम करून त्यावर कांदे लालसर होईपर्यंत परतून घ्या.आता त्यात आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घालून    २ ते ३ मिनिटे परतून घ्या. आता त्यात हळद,लाल तिखट,धने पूड घालून परतून घ्या.त्यातच मॅरीनेट केलेले चिकन घालून मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्या. टोमॅटो,काजू आणि मिरचीची पेस्ट घालून पुन्हा परतून घ्या.आता चवीनुसार मीठ ,चिकन मसाला,गरम मसाला व कसुरी मेथी घालून चांगले परतून घ्या.आता त्यात ३ वाट्या पाणी घालून मंद आचेवर १५ मिनिटे शिजू द्या.अशाप्रकारे चिकन करी तयार…

सौ.अर्चना अनिल धनेवार,    न्यू पनवेल.

Comments are closed.