भिन्न

आंबोळी व मोड आलेल्या मुगाची आमटी

Comments are Disabled

साहित्य:-३वाट्या जाडे तांदुळ, अर्धी वाटी चणा डाळ,अर्धी वाटी उडदाची डाळ,१ वाटी पोहे आणि १ चमचा दाना मेथी 
कृती:- सर्व साहित्य ६ तास भिजत ठेवावे.त्यानंतर ते एकजीव वाटून घ्यावे. आणि किमान ६ तास आंबवायला ठेवावे .त्यानंतर बीडाचा तवा घेवून त्यावर डोश्या सारखी आंबोळी करावी….करताना त्यात चवीनुसार मीठ,साखर आणि हळद घालावी छान चव येते.

मुगाची आमटी

साहित्य:-मोड आलेले मूग अर्धा वाटी ,कांदा ,लसूण हिरवी मिरची,ओले नारळ ,आमसुले किंवा आगळ, चिंच घेतली तरी चालेल चवी नुसार मीठ,गूळ आणि जिरे.
कृती:-कढईत थोड्या तेलावर कांदा ,लसूण चवीनुसार हिरवी मिरची छान परतवून घ्यावी.त्यानंतर हे सारण आणि मोड आलेले मूग वाटून घ्यावे.त्यानंतर तेल, मोहरी, हिंग, जिरे ,कढीपत्ता यांची फोडणी करावी व वाटलेले सारण त्यात घालून थोडे पाणी घालावे चवी नुसार मीठ,गूळ आणि चिंच किंवा आमसूले घालावे व त्यात ओले नारळ घालून छान उकळून गरमागरम सर्व्ह करावे .आंबोळी बरोबर पण ही आमटी छान लागते तसेच चपाती किंवा भात खिचडी बरोबरही खायला छान लागते…


चटणी

साहित्य:-अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे,अर्धा वाटी नारळाचा चव(नारळ नसेल तर डाळवा घ्यावा),हिरवी मिरची,कोथिंबीर,मीठ,दही,साखर


कृती:- दाणे थोडावेळ पाण्यात भिजत ठेवावे.नंतर दाणे,खोबरं, चवीनुसार दही,मीठ,मिरची, कोथींबीर साखर हे साहित्य मिक्सर मधून छान वाटून घ्यावं, हवं असल्यास पाणी घाला. त्यावर हिंग व लाल मिरची, कढीपत्त्याची फोडणी द्यावी .ही चटणी ३दिवस फ्रीज मध्ये छान राहते.आंबोळी किंवा वडे कश्याहीबरोबर खूप छान लागते.


       सौ.मैथिली देवदत्त पांडे         खारघर (नवी मुंबई)

Comments are closed.