
काजू कतली
साहित्य:-१ कप काजू,१/२ कप साखर,१/४ कप पाणी,१ टीस्पून तूप,१/४ टीस्पून वेलचीपूड,सजावटी करीता केसर…
कृती:-प्रथम मिक्सर मधे काजूची बारीक पावडर करून चाळणीतून चाळून घ्यावी. एका नाॅन स्टिक पॅन मधे साखर व पाणी घेऊन बारीक आचेवर एकतारी पाक बनवावा. आता त्यात बारीक आचेवर काजू पावडर टाकून मिक्स करावे. वेलचीपूड व केसर टाकून ढवळत राहावे. मिश्रण घट्ट झाले कि १ चमचा तूप टाकावे. तूप मिश्रणात एकजीव झाले कि पॅन पासून वेगळे होण्यास सुरवात होते. मग गॅस बंद करावा. एका बटर पेपरला तूप लावावे आणि हे मिश्रण त्यावर टाकावे. हाताला तूप लाऊन ३० ते ४० सेकंद मळावे. वरुन दुसरा बटर पेपर ठेऊन लाटून घ्यावे आणि डायमंड आकाराचे काप करावेत.वरून केशर, काजू किंवा पिस्ता चे काप टाकून
सजवावे…
सौ. दीप्ती विक्रांत राखूंडेन्यु जर्सी, युनायटेड स्टेट्स,