भिन्न, मिठाई

दाळव्याचे लाडू

Comments are Disabled

साहित्य :- 1 वाटी दाळवा,  अर्धी वाटी बारीक पिठी साखर,  वेलची,  काजू बदामाचे काप,  पाव वाटी साजूक तूप.


कृती :-  दाळवा कमी आचेवर भाजून घ्यावा.  मिक्सरमधून छान रवेदार पीठ करून घ्यावे. नंतर कढईत पीठ आणि साजूक तूप घालून खरपूस गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे.त्यात पिठी साखर, वेलची आणि काजू बदाम टाकून गोल लाडू वळावेत.  चवीला अत्यंत खुसखुशीत आणि छान लागतात आणि झटपट होतात.


      सौ. अनुश्री अनिल भुसारी         खारघर, नवी मुंबई.        

Comments are closed.