
साहित्य
एक वाटी बारीक रवा , दीड वाटी बेसन (चणाडाळीचे पीठ),एक वाटी साजूक तूप, दीड वाटी साखर, थोडी वेलची पूड, काजू-बदामचे काप.
कृती*
मंद आचेवर रवा आणि बेसन तूप घालून वेगवेगळे भाजून घ्यावे. रवा भाजावा जरा सुगंध यायला लागला की लगेच काढून घ्यावा,रंग बदलायला नको. बेसन खरपूस भाजावे.बेसन भाजायला तूप रव्यापेक्षा जास्त लागते.
एका पातेल्यात साखरेचा दोन तारी पाक करावा त्यात वेलची पूड घालावी. अर्धा पाक रव्यामधे घालावा, चांगले ढवळून घ्यावे, मिश्रण घट्ट होत आले की एका ताटाला तूप लावून त्यात ओतावे.राहिलेला अर्धा पाक बेसनामध्ये घालून चांगले ढवळावे. रव्याचे मिश्रण कोमट झाले की त्यावर हे मिश्रण ओतावे.त्यावर काजू-बदामाचे काप घालावेत व थंड होत आले की वड्या कापाव्यात.
श्रीमती आशा वसंतराव माळवे
म्हसोला(का.)जि. यवतमाळ



