
पपई लाडू
साहित्य
१ कप पपईचा पल्प,१ कप डेसिकेटेड कोकोनट, १ मोठा चमचा चिरलेला गूळ, २ मोठे चमचे मिल्क पावडर,१/२ चमचा वेलची पूड, सजावटीसाठी बदाम-पिस्ता काप
कृती
पॅनमध्ये पपईचा पल्प घालून माध्यम आचेवर शिजवून घ्या.
आता त्यात गूळ घाला.
मिश्रण थोडं घट्ट होत आलं कि त्यात डेसिकेटेड कोकोनट घाला.
आता पूर्ण पाणी सुकेपर्यंत पल्प शिजवून घ्या.
मिश्रण तळाला लागू नये यासाठी मिश्रण सतत ढवळत राहा.
मिश्रण घट्ट झालं कि गॅस बंद करा.
मिश्रण थोडं कोमट असतानाच त्यात मिल्क पावडर आणि वेलची पूड घालून एकजीव करा.
आता मिश्रण फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवा.
आता मिश्रण बाहेर काढून त्याचे लाडू वळून डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवा.
वरून बदाम-पिस्त्याचे काप लावून सजवा



