
पास्ता
साहित्य
१ कप होल ग्रेन पेने पास्ता,१/४ कप लाल भोपळी मिरचीचे छोटे चौकोनी तुकडे,१/४ कप हिरव्या भोपळी मिरचीचे छोटे चौकोनी तुकडे,१/४ टीस्पून लाल तिखट,
३ टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल, १ टेबल स्पून किसलेलं पार्मिजान चीझ,२ चिमूट ओरेगानो,आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स
कृती
एका मोठ्या खोल पातेल्यात ५ ते ६ कप पाणी आणि मीठ टाकून उकळवावे.
पाणी उकळायला लागले कि त्यात पास्ता घालून मोठ्या आचेवर १५ ते २० मि.शिजवून घ्या.
पास्ता तळाला चिटकू नये म्हणून मधेमधे तळापासून ढवळत राहावे.
पास्ता शिजला कि एका चाळणीत काढून घ्या आणि त्यावर थंड पाणी घाला.
सर्व पाणी निघून जाऊ द्या.
पॅनमध्ये १ टीस्पून तेल गरम करून त्यात लाल आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून १ मिनिटभर परतून घ्या.
आता त्यात चिमूटभर ओरेगानो,लाल तिखट,मीठ आणि ३ टेबलस्पून पास्ता सॉस घालून लगेच त्यात शिजलेला पास्ता घाला..
गॅस मंद ठेवून १ मिनिटभर नीट मिक्स करा.
मिक्स करून झाल्यावर लगेच सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्या.
सर्व्ह करताना त्यावर चिमूटभर ड्राय ओरेगानो चुरून भुरभुरा आणि पार्मिजान चीझ घाला.