मिठाई, मुख्य रेसिपी

सफरचंद जिलेबी विथ गुलाब आईस्क्रिम

Comments are Disabled

सफरचंद जिलेबीसाठी साहित्य
दोन मध्यम आकाराचे सफरचंद,एक कप मैदा,दीड साखर ,थोडंसं केशर,तळण्यासाठी तूप,पाव टीस्पून वेलची पूड,अर्धा टीस्पून ड्राय यिस्ट,एक टीस्पून गुलाबाचं पाणी,सजावटीसाठी पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या

गुलाब आईस्क्रिमसाठी साहित्य
१०० ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्या,२०० मिली व्हॅनिला आईस्क्रिम,दोन ते तीन टेबलस्पून गुलकंद,पाऊण कप पिस्त्याचे आणि बदामाचे काप

सफरचंद जिलेबीची कृती
प्रथम सफरचंदाची सालं काढून घ्या आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या.
नंतर एका भांड्यात साखरेचा पाक तयार करून घ्या.
त्यात केशर घाला.
एका कढईत साजूक तूप गरम करा.
दुसऱ्या भांड्यात यीस्ट आणि गरम पाणी घेवून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या.
आता त्यात मैदा, वेलची पूड,सफरचंदाचे तुकडे आणि गुलाबपाणी घाला.
मिश्रणात सफरचंदाचे तुकडे असल्यामुळे गरम तुपात नेहमीपेक्षा वेगळ्या आकारात जिलेबी सोडा.
जिलेबी तळून झाल्यावर साखरेच्या पाकात सोडा.
नंतर पाकामधून जिलेबी काढून त्यावर पिस्त्याचे काप भुरभुरा.

गुलाब आईस्क्रीमची कृती
मिक्सरच्या भांड्यात  व्हॅनिला आईस्क्रीम घेवून त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलकंद घालून वाटून घ्या.नंतर हे मिश्रण एका भांड्यात घेवून त्यात पिस्ता आणि बदामाचे काप घालून फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा.

टीप – सर्व्ह करताना सफरचंद जिलेबीवर गुलाब आईस्क्रीमचा स्कूप ठेवा.

Comments are closed.