मुख्य

पनीर बटर मसाला

Comments are Disabled

पनीर बटर मसाला

साहित्य :
पनीरचे तुकडे- 100 ग्रॅम

क्रिम- 1 वाटीबारीक

चिरलेला कांदा- 1

आलं लसूण पेस्ट- 1 चमचा

तुकडे केलेली सिमला मिरची- अर्धी

हळद- पाव चमचा

लाल तिखट- 1 छोटा चमचा

गरम मसाला- अर्धा चमचा

धणे पूड- किंचित

मिरपूड- किंचित

टोमॅटो केचप- 3 ते 4 चमचे

बटर

तेल 

मीठ

कृती:

कढईत तेल आणि बटर गरम करुन त्यात चिरलेला कांदा परतून घ्या.कांदा परतल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या.आता त्यात सिमला मिरचीचे तुकडे, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड आणि मीठ घालून परतून घ्या.त्यात थोडं पाणी घाला आणि नंतर त्यात टोमॅटो केचअप घालून मिक्स करा.आता गॅस मंद करुन त्यात लाल तिखट आणि बटर घालून मिक्स करा.आता त्यात क्रीम घालून परतून घ्या.ग्रेवी तयार झाल्यावर त्यात पनीरचे तुकडे मिक्स करुन मिरपूड, गरम मसाला आणि बटर घालून मिक्स करुन एक छोटी उकळी आणाअशाप्रकारे पनीर बटर मसाला तयार.

Tags

Comments are closed.