
साहित्य
भिजवलेली पाव वाटी चणा डाळ,
पाव वाटी उडीद डाळ आणि २ चमचे तुरीची
डाळ यांचं वाटलेलं मिश्रण
आलं-लसूण-मिरची पेस्ट आवडीप्रमाणे
व्हिनेगर २ चमचे
सोया सॉस ३ ते ४ चमचे
बारीक चिरलेलं आलं-लसूण-मिरची १ छोटी वाटी
कॉर्न फ्लोअर पेस्ट छोटी वाटी
लाल तिखट पाव चमचा
मिरपूड पाव चमचा
साखर किंचित
बारीक चिरलेला कोबी
बारीक चिरलेलं गाजर
बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची
बारीक चिरलेला पतीचा कांदा
कृती
बाऊलमध्ये डाळीचं मिश्रण घेऊन त्यात आलं-लसूण-मिरची पेस्ट,विनेगर,सोया सॉस,चिरलेला कोबी,चिरलेलं गाजर,चिरलेली हिरवी सिमला मिरची आणि चिरलेला पातीचा कांदा घालून मिक्स करा.
तयार मिश्रणाचे मंच्युरीयन तयार करून गरम तेलात तळून घ्या.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेलं आलं-लसूण-मिरची घालून परतून घ्या.
आता त्यात चिरलेला पातीचा कांदा घालून परतून घ्या.
कांदा परतून झाल्यावर त्यात चिरलेला कोबी,चिरलेलं गाजर,चिरलेली हिरवी सिमला मिरची,विनेगर,सोया सॉस,मीठ आणि थोडं पाणी घालून उकळी आणा.
उकळी आल्यावर त्यात लाल तिखट,मिरपूड आणि साखर घालून मिक्स करा.
आता त्यात तयार मंच्युरीयन घालून परतून घ्या.
मंच्युरियन परतून झाल्यावर त्यात कॉर्न फ्लोअरची पेस्ट घालून मिक्स करा.
अशाप्रकारे डाळ मंच्युरीयन तयार



