साहित्य

जिरं,काळीमिरी,दालचिनी घालून ८०%
शिजवलेला भात
स्लाइस कांदे २ मध्यम
आलं-लसूण पेस्ट छोटा दीड चमचा
दही छोटी वाटी
हळद पाव चमचा
लाल तिखट १ चमचा
बिर्याणी मसाला अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
वेलची पावडर पाव चमचा
चिरलेले मशरूम ८ ते १०
बारीक चिरलेली १ जुडी
उकडलेले मक्याचे दाणे १ वाटी
पुदिना
बारीक चिरलेली कोथिंबीर
तूप
तेल
मीठ
कृती
कढईत तूप आणि तेल गरम करून त्यात स्लाइस केलेले कांदे घालून गुलाबी रंगावर परतून घ्या.
कांदे परतून झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
आता त्यात हळद,लाल तिखट,बिर्याणी मसाला,वेलची पावडर आणि मीठ घालून परतून घ्या.
गॅस मंद करून त्यात दही घालून परतून घ्या.
मशरूम परतून झाल्यावर त्यात चिरलेली मेथी आणि थोडं पाणी घालून मिक्स करा.
आता त्यात उकडलेले मक्याचे दाणे घालून परतून घ्या.
मक्याचे दाणे परतल्यावर त्यात मीठ आणि थोडा बिर्याणी मसाला घालून शिजवून घ्या.
शिजल्यावर तयार भात त्यावर पसरवून वरून तूप सोडा आणि हळद भुरभुरून थोडं पाणी शिंपडा. आता त्यावर पुदिन्याची पानं आणि चिरलेली कोथिंबीर पसरवून झाकण ठेवून बिर्याणीला दम द्या.
अशाप्रकारे थ्री एम बिर्याणी तयार



