
साहित्य:
पारीसाठी मैदा 2 कप , रवा 2 मोठे चमचे, तूप 1 मोठा चमचा, खायचा सोडा चिमूटभर, साखर 1 छोटा चमचा
सारणासाठी खवा 1 कप, रवा 1 मोठा चमचा, पिठीसाखर 2 मोठे चमचे, वेलची पूड 1 छोटा चमचा, काजू बदामची जाडसर पावडर 2 मोठे चमचे साखरेच्या पाकासाठी साखर 2 कप, पाणी 1 कप, केसर किंवा केशरी रंग, तळण्यासाठी तूप आणि 20-25 लवंगा
कृती:-
मैद्यामध्ये सोडा, 1 छोटा चमचा साखर आणि कडकडीत मोहन टाकून पाण्याने घट्ट पीठ मळून घ्या.कढईमध्ये रवा आणि खवा भाजून घ्या.थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर,वेलची पूड,काजू बदाम पावडर घालून मिश्रण करून सारण तयार करावे.साखर व पाणी एकत्र करून थोडा घट्टसर पाक तयार करून घ्यावा.त्यामध्ये केसर किंवा केशरी रंग घालावा.तयार पिठाच्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरून घट्ट वळकुटी करून वेटोळा घाला आणि त्यावर एक लवंग खोचा.अशाप्रकारे सर्व लवंग लतिका तयार करून घ्याव्यात.कढईत तूप गरम करून लवंग लतिका मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत तळून घ्याव्यात.तळून झाल्यावर पाकामध्ये दोन-तीन मिनिटे बुडवून ठेवाव्यात.नंतर एका ताटात काढून थंड झाल्यावर सर्व्ह करा.


