मुख्य रेसिपी

कडव्या वालाची युनिक भाजी

Comments are Disabled

साहित्य
वाफवलेली कडव्या वालाची भाजी अर्धा बाऊल
बारीक चिरलेले कांदे २ मध्यम
किसलेलं खोबरं अर्धी वाटी
हळद पाव चमचा
हिंग पाव चमचा
तळलेल्या लाल मिरचीचा चुरा पाव चमचा
जिरं
मोहरी
हिरव्या मिरचीचे तुकडे
कडीपत्त्याची पानं
काश्मिरी लाल तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर
साखर
तेल
मीठ

कृती
प्रथम वाटीत पाणी घेऊन त्यात हळद,हिंग आणि तळलेल्या हिरव्या मिरचीचा चुरा घालून मिश्रण तयार करा.
कढईत तेल गरम करून त्यात जिरं आणि मोहरी घाला. जिरं-मोहरी तडतडल्यावर त्यात कडीपत्त्याची पानं,हिरव्या मिरचीचे तुकडे आणि मसाल्याचे मिश्रण घालून फोडणी तयार करा.
आता त्यात बारीक चिरलेला कांदा परतून झाकण ठेवून शिजवून घ्या.
कांदा शिजल्यावर त्यात वाफवलेली भाजी,किसलेलं खोबरं,मीठ आणि साखर घालून परतून घ्या आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.
वाफ आल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
कढल्यात तेल गरम करून त्यात मोहरी,जिरे आणि काश्मिरी लाल तिखट घालून फोडणी तयार करा.
तयार भाजी प्लेटमध्ये घेऊन त्यावर फोडणी पसरवून कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याने सजवून सर्व्ह करा.

Comments are closed.