
साहित्य
चिकां खिमा अर्धा किलो
मोड आलेले मसूर २०० ग्रॅम
स्लाइस केलेले कांदे ३ मध्यम
हळद पाव चमचा
लाल तिखट दिड चमचा
धणा पावडर १ चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
आलं-लसूण पेस्ट ३ छोटे चमचे
बटर १ चमचा
खडा मसाला
बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल
मीठ
कृती
प्रथम कढईत तेल आणि बटर गरम करून त्यात खडा मसाला परतून घ्या.
आत त्यात स्लाइस केलेले कांदे परतून घ्या.
कांदे परतल्यावर त्यात हळद,लाल तिखट,धणा पावडर आणि ग्राम मसाला घालून परतून घ्या.
मसाले परतल्यावर आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
आता त्यात मोड आलेले मसूर घालून परतून घ्या.
परतना थोडं मीठ घाला.
मसूर परतल्यावर त्यात अर्धा किलो खिमा घालून परतून घ्या आणि झाकण ठेवून मंद आचेवर ८ ते १० मि. शिजवून घ्या.
खिमा शिजल्यावर त्यात अर्धी वाटी पाणी घाला.
आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम मसाला भूरभूरा आणि मिक्स करा.
आता पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर ५ मि. शिजवून घ्या.
अशाप्रकारे खिमा मसूर तयार


