पिनव्हील समोसा
साहित्य
१ वाटी मैदा,२ मोठे चमचे रवा,
तेल,ओवा आणि मीठ यांची
तयार कणिक
उकडून किसलेले बटाटे : २ मोठे
शहाजिरे : अर्धा चमचा
आलं-लसूण पेस्ट : १ चमचा
लाल तिखट : १ चमचा
चिरलेली हिरवी मिरची : आवडीप्रमाणे
धण्याची भरड : १ चमचा
बडीशेप : अर्धा चमचा
शिजवलेले वाटाणे : २ चमचे
आमचूर पावडर : २ चमचा
जिरे पूड : अर्धा चमचा
गरम मसाला : अर्धा चमचा
साखर : पाव चमचा
कॉर्नफ्लोवर : २ चमचे
चिरलेली कोथिंबीर
तेल
मीठ
Directions
- Morbi in sem quis dui placerat ornare. Pellentesque odio nisi, euismod in, pharetra a, ultricies in, diam. Sed arcu. Cras consequat.
- Praesent dapibus, neque id cursus faucibus, tortor neque egestas augue, eu vulputate magna eros eu erat. Aliquam erat volutpat. Nam dui mi, tincidunt quis, accumsan porttitor, facilisis luctus, metus.
- Phasellus ultrices nulla quis nibh. Quisque a lectus. Donec consectetuer ligula vulputate sem tristique cursus. Nam nulla quam, gravida non, commodo a, sodales sit amet, nisi.
- Pellentesque fermentum dolor. Aliquam quam lectus, facilisis auctor, ultrices ut, elementum vulputate, nunc.
कृती
प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात शहाजिरे परतून घ्या.
शहाजिरे परतल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
पेस्ट गुलाबीसर झाल्यावर त्यात उकडून किसलेले बटाटे घालून परतून घ्या.
आता त्यात लाल तिखट,बारीक चिरलेली हिरवी मिरची,धण्याची भरड आणि बडीशेप घालून परतून घ्या.
आता त्यात शिजवलेले वाटाणे,आमचूर पावडर,जिरे पूड,गरम मसाला,साखर,मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्या.
तयार सारण बाऊलमध्ये काढून घ्या.
आता मैद्याच्या कणकेची पोळी लाटून त्यावर तयार सारण पसरवा.
आता पोळीचा रोल करून कट करून घ्या आणि कॉर्नफ़्लोअरच्या पेस्टमध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्या.
अशाप्रकारे पिनव्हील समोसा तयार




