भूक

केळफुलाची बिर्याणी

Comments are Disabled

साहित्य
बारीक चिरलेल्या केळफुलाच्या पाकळ्या : १ मोठी वाटी
तयार बिर्याणी राईस : आवश्यकतेप्रमाणे
स्लाईस केलेले कांदे : ३ मध्यम
आलं-लसूण पेस्ट : दीड चमचा
लाल तिखट : १ चमचा
धणा पावडर : १ छोटा चमचा
जिरा पावडर : अर्धा चमचा
गरम मसाला : पाव चमचा
दही : १ चमचा
चिरलेली कोथिंबीर
तूप
तेल
मीठ

कृती

कढईत तेल आणि तूप गरम करून त्यात स्लाइस केलेले कांदे परतून घ्या.
कांदे गुलाबीसर झाल्यावर त्यात चिरलेल्या केळफूलाच्या पाकळ्या परतून घ्या.
आता त्यात आलं-लसूण पेस्ट,लाल तिखट,धणा पावडर,जिरा पावडर,गरम मसाला आणि मीठ घालून परतून घ्या आणि त्यात थोडं पाणी घाला.
आता त्यात दही आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून मंद आचेवर ५ ते ७ मि.शिजवून घ्या.
शिजल्यावर त्यात थोडं तूप,मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
आता त्यावर तयार बिर्याणी राईस पसरवून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि थोडा गरम मसाला भुरभुरुन झाकण ठेवून मंद आचेवर ७ ते ८ मि.दम द्या.
अशाप्रकारे केळफुलाची बिर्याणी तयार

Comments are closed.