मिठाई

शाही दूध पनीर

Comments are Disabled


शाही दूध पनीर

साहित्य :


दुधीचे काप- आवश्यकतेप्रमाणे

किसलेलं पनीर- आवश्यकतेप्रमाणे

जिरं- पाव चमचा

हिंग- किंचित

लवंग, दालचिनी, काळिमिरी,

सुक्या मिरच्या यांचा तयार मसाला- अर्धी वाटी

लाल तिखट- अर्धा चमचा

भाजलेला कांदा, टोमॅटो आणि काजू यांचं वाटण- 1 मोठी वाटी

किसलेलं बीट- आवडीप्रमाणे

कोथिंबीरतेलमीठ

कृती:

कढईत तेल गरम करुन त्यात जिरं, हिंग, तयार मसाला आणि लाल तिखट घालून परतून घ्या.आता त्यात तयार वाटण घालून परतून घ्या.आता त्यात थोडं पाणी आणि मीठ घालून मिक्स करा.किसलेलं बीट घाला आणि उकळी आल्यावर गॅस बंद करा.दुधीच्या कापांचा मधला भाग गोलाकार कट करुन घ्या.आता गरम तेलावर दुधीचे काप फ्राय करुन घ्या.किसलेल्या पनीरमध्ये मीठ घालून ते फ्राय केलेल्या दुधीच्या कापांमध्ये स्टफ करा.तयार ग्रेव्ही प्लेटमध्ये काढून त्यात पनीर स्टफ केलेले दुधीेचे काप ठेवा आणि कोथिंबीरीने सजवा.अशाप्रकारे शाही दुधी पनीर तयार. 

Comments are closed.