कडकनाथ चिकन मसाला

साहित्य :
कडकनाथ चिकन- साधारण 1 किलो
स्लाईस केलेले कांदे- 3 ते 4
लाल तिखट- आवडीप्रमाणे
हळद- अर्धा चमचा
बारीक चिरलेली लसूण- दीड चमचा
आलं-लसूण पेस्ट- 1 चमचा
गरम मसाला- आवडीप्रमाणे
तयार सुकं वाटण- अर्धी वाटी
खडा मसालातेलमीठ
कृती:
चिकनला हळद, लाल तिखट आणि मीठ लावून मॅरीनेट करुन घ्या आणि अर्धा तास ठेवून द्या.कढईत तेल गरम करुन त्यात खडा मसाला घालून परतून घ्या.खडा मसाला परतल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या.आता त्यात चिरलेलं आलं, लाल तिखट आणि स्लाईस केलेले कांदे घालून परतून घ्या.कांदे शिजल्यावर त्यात चिकन घालून परतून घ्या.आता त्यात गरम मसाला, सुकं वाटण आणि पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्या.अशाप्रकारे कडकनाथ चिकन मसाला तयार.



