
साहित्य:
२ वाट्या मैदा, १ वाटी पालक, १ वाटी किसलेलं गाजर, १ वाटी किसलेलं बीटर, १ वाटी बारीक चिरलेला कोबी, १ वाटी किसलेलं पनीर, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, १ चमचा किसलेलं आलं, २ चमचे मिरीपूड, २ चमचे सोया सॉस, चवीनुसार मीठ आणि तेल
कृती:
सर्वप्रथम पालक मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवून घ्या.
नंतर एका बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये एक चमचा तेल, चवीनुसार मीठ, पालक पेस्ट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या.
नंतर मळलेले पीठ एका ओलसर मलमलच्या कपड्यानं पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवा.
नंतर मोमोजचं स्टफिंग तयार करण्यासाठी एका नॉनस्टिक कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये किसलेलं आलं आणि बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून परतवून घ्या.
नंतर त्यामध्ये सर्व भाज्या, मिरीपूड, सोया सॉस आणि चवीनुसार मीठ टाकून पाच ते सात मिनिटं वाफवून घ्या.
सर्वात शेवटी पनीर टाका आणि गॅस बंद करुन स्टफिंग थंड होऊ द्या.
नंतर मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करुन घ्या.
एका गोळ्याची पुरी लाटून त्यामध्ये दोन चमचे तयार स्टफिंग भरुन मोमोज तयार करुन घ्या.
अशा प्रकारे सर्व मोमोज तयार करुन वाफवून घ्या व गरमागरम मोमोज चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.